सांजवार्ता
Date: 07/11/2026
५८६ गाव-वाड्यांमध्ये पाण्याचे भीषण दुर्भिक्ष; ५६० टँकरद्वारे पाणीपुरवठा
६ जिल्ह्यांतील विहिरींचे अधिग्रहण
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत. संपूर्ण विभागात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. सद्यःस्थितीत विभागातील ३५३ गावे आणि २३३ वाड्यांमधील
हिंगोली, नांदेड हे दोन जिल्हे वगळून मराठवाड्यातील उर्वरित सहा जिल्ह्यांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ३ नोव्हेंबरच्या अहवालानुसार एकूण ९१७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७४, जालना ७५, परभणी १९, बीड १०३, लातूर ३०२, तर धाराशिव जिल्ह्यातील ३४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
नागरिकांची तहान भागवण्यासाठी ५६० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, केवळ गेल्या १५ दिवसांतच १०० नवीन टँकर सुरू करावे लागले आहेत, यावरून टंचाईची तीव्रता स्पष्ट होते. दिलासादायक बाब म्हणजे, विभागातील चार जिल्हे अद्याप टँकरमुक्त
आहेत.
जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परभणी वगळता विभागातील उर्वरित सात जिल्ह्यांतील एकूण २५७ गावे आणि १३० वाड्यांना ४२८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात टँकरच्या
चार जिल्हे अद्यापही टँकरमुक्त
सर्वाधिक गंभीर परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यातील १७२ गावे आणि १८३ वाड्यांना २९४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११९ गावे आणि ३४ वाड्यांना मिळून १७९ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यातील ४९ गावे आणि १६ वाड्यांना ६८ टँकरद्वारे तर धाराशिव जिल्ह्यातील १३ गावांतील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी १९ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर ही चार जिल्हे सुदैवाने अद्याप तरी टँकरमुक्त आहेत.
संख्येत घट झाली होती. सप्टेंबर अखेर विभागातील १५७ गावे आणि १०३ वाड्यांना २९५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. केवळ २० दिवसांत टँकरच्या संख्येत दुप्पट वाढ झाली. २०
ऑक्टोबर दरम्यान विभागात २५५ गावे आणि १८२ वाड्यांना ४४१ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू होता. विभागातील ३५३ गावे आणि २३३ वाड्यांना ५६० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
https://epaper.sanj Powered By Vrudhee Solutions












